मुंबई

प्रेमसंबंध तोडल्यामुळे प्रेयसीचे अश्‍लील व्हिडीओ आणि चॅट केले व्हायरल, ब्लॅकमेलिंगचा गुन्हा

नवी मुंबईत राहणाऱ्या तरुणीची ओळख पाच वर्षांपूर्वी गुरवैयासोबत झाली होती.

Swapnil S

मुंबई : प्रेमसंबंध तोडणाऱ्या एका २२ वर्षांच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने अश्‍लील व्हिडीओ आणि चॅट प्रसिद्ध करून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लैगिंक अत्याचाराचे व्हिडीओ दाखवून त्याने ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुरवैया बुसिरासी या ४१ वर्षांच्या आरोपी प्रियकराविरुद्ध साकीनाका पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देणे आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आरोपी प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या तरुणीची ओळख पाच वर्षांपूर्वी गुरवैयासोबत झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. याचदरम्यान तो तिला साकीनाका येथील एका लॉजमध्ये घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याचे त्याने मोबाईलवरून व्हिडीओ बनविले होते. तेच व्हिडीओ दाखवून त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. तिने संबंध तोडल्याने त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्‍लील व्हिडीओ आणि चॅटमधील मॅसेज एका मेमरी कार्डमध्ये डाऊनलोड करून तिच्या राहत्या सोसायटीच्या रहिवाशांना पाठविले होते. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली होती.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली

पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’