मुंबई

मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य; कोल्डमिक्स वापरूनही रस्त्यात खड्डे

प्रतिनिधी

कोल्ड मिक्सचा वापर करूनही मुंबईतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य दिसते. २०१९ पासून कोल्डमिक्सचा वापर सुरू करण्यात आला असून मुंबईच्या रस्त्यांनी आतापर्यंत ३ हजार मेट्रिक टन कोल्ड मिक्स वापरूनही पहिल्या पावसात पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे कोल्ड मिक्सच्या दर्जावर संशय घेतला जातो. मात्र यावर काही पर्याय महापालिका का काढत नाही, असा सवाल सर्वसामान्य मुंबईकर विचारात आहे.

मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील खड्ड्यांवर उपचार म्हणून कोल्डमिक्सला पसंती दिली. कोल्डमिक्सच्या निर्मितीसाठी पालिकेने वरळीमध्ये कोल्डमिक्सचा प्रकल्प उभारला. येथे कोल्डमिक्स तयार करून ते सर्व विभाग कार्यलयांना पुरवले जाते. गेल्या तीन वर्षांत सव्वा तीन हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन पालिकेने यंदा २२४४.५ मेट्रिक टन (८९७८० बॅग) कोल्डमिक्सचे उत्पादन केले. गरजेनुसार त्यातील २१५४.२५ मेट्रिक टन (८६१७० बॅग) कोल्डमिक्सचे वाटप विभाग कार्यालयांना करण्यात आले आहे. सध्या पालिकेकडे ९०.२५ मेट्रिक टन (३६१० बॅग) कोल्डमिक्स शिल्लक आहे.

पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर २७९ खड्डे!

यंदा मुंबईतील एकूण ४२७.२७ चौरस मीटर जागेवरील खड्डे भरल्याचा त्यांचा दावा आहे. यासाठी एकूण २९.२२५ मेट्रिक टन म्हणजेच ११६९ बॅग कोल्डमिक्स वापरण्यात आले आहे. सर्वाधिक खड्डे हे जी उत्तर ५०, एस ४५ व पी उत्तर विभागात भरले असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर २७९ खड्डे झाले असल्याचे म्हटले आहे. त्यातील २६१ खड्डे भरण्यात आले आहेत.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू