मुंबई

एलआयसीची बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्याची विशेष मोहीम सुरु

वृत्तसंस्था

एलआयसीच्या पॉलिसीधारकांना त्यांची पाच वर्षांच्या आत बंद पडलेली व्यक्तीगत पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे. ही विशेष मोहीम १७ ऑगस्टपासून सुरु होणार असून २१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मात्र, त्यासाठी पॉलिसीधारकांना विलंब फी भरावी लागणार आहे. एकूण भरावा लागणाऱ्या प्रिमियमवर विलंब फीवर जास्तीत जास्त सवलत देण्यात आली आहे. १ लाख प्रिमियमवर २५ टक्के किंवा २,५०० रुपये सवलत तर १,००,००१ ते ३,००,००० रुपये प्रिमियमवर २५ टक्के किंवा तीन हजार रुपये आणि ३,००,००१ आणि त्यावरील प्रिमियमवर ३० टक्के किंवा जास्तीत जास्त ३,५०० रुपये सवलत मिळणार आहे. तसेच मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीजवर विलंब शुल्कावर १०० टक्के सवलत देऊन पुन्हा विम्याचे छत्र मिळण्याची सुविधा मिळत आहे. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज असलेल्या पॉलिसींवर कुठलीही सवलत दिली जाणार नाही.

यूएलआयपी प्लन शिवाय असलेल्या पॉलिसीज ज्यांची मुदत संपलेली नाही त्या या मोहिमेत पुन्हा सुरु करण्यासाठी पात्र असतील. काही कारणास्तव प्रिमियम भरु न शकलेल्या पॉलिसीधारकांना त्यांची बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. जीवन विमा हा अचानक जीव गमावणाऱ्यांना आर्थिक मदत करत असतो. त्यामुळे बंद पडलेली पॉलिीस सुरु करुन आपल्या कुटुंबियांचे आर्थिक हित जपण्यासाठी एलआयसीने ही मोहीम सुरु केली आहे.

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार