मुंबई

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक

ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते

नवशक्ती Web Desk

मुंबई : लैगिंक अत्याचारप्रकरणी एका ३४ वर्षांच्या आरोपी प्रियकराला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. धर्मेद्र आनंद गोस्वामी असे या आरोपीचे नाव असून, पोलीस कोठडीनंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धर्मेद्रने पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा परिसरात पिडीत ३० वर्षांची पिडी तरुणी राहते. मार्च महिन्यांत तिची अंधेरी येथेच राहणाऱ्या धर्मेशशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान धर्मेंद्रने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिला तो आवडत होता, त्यामुळे तिने त्याला होकार दिला होता.

मार्च ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. तो प्रत्येक वेळेस त्याच्या अंधेरीतील वर्सोवा, म्हाडाच्या नैमिनाथ लक्झरिया इमारतीमधील राहत्या घरी घेऊन येत होता. तिथेच त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. ऑगस्ट महिन्यांत तिने त्याला लग्नाविषयी विचारणा केली होती. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्याने तिला शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. या प्रकारानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती.

बिहारमध्ये तणाव वाढला! उपमुख्यमंत्री विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला; RJD वर आरोप करत म्हणाले - “यांच्या छातीवर बुलडोझर..."

“मी कोणत्या गोंधळात अडकलेय”! राहुल गांधींच्या दाव्यानंतर ब्राझिलच्या मॉडेलची पहिली प्रतिक्रिया; Video व्हायरल

सुरज चव्हाणची लगीनघाई! अंकिताने केलं थाटात केळवण; 'झापूक झूपुक' अंदाजात घेतला उखाणा, व्हिडिओ व्हायरल

Mumbai : BMC च्या महिला आरक्षण सोडतीची तारीख जाहीर; SC, ST आणि OBC प्रवर्गांसाठी प्रक्रिया सुरू

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न