मुंबई

गौतम अदानी यांचे ‘की टू की’ आश्वासन; झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बाबतीत मैलाचा दगड

गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या नेतृत्वाखाली आकार घेत असलेला धारावी पुनर्वसन प्रकल्प हा केवळ एक रिअल इस्टेटचा प्रकल्प नसून नागरी पुनरुत्थानाच्या क्षमतेबाबतचे एक स्पष्ट आणि धाडसाचे विधान आहे.

Swapnil S

मुंबई : गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या नेतृत्वाखाली आकार घेत असलेला धारावी पुनर्वसन प्रकल्प हा केवळ एक रिअल इस्टेटचा प्रकल्प नसून नागरी पुनरुत्थानाच्या क्षमतेबाबतचे एक स्पष्ट आणि धाडसाचे विधान आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाच्या गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्याची एक ब्लूप्रिंटही आहे. ‘की टू की’ (घरासमोर घर - एक धाडसी पाऊल) च्या आश्वासनात विद्यमान रहिवाशांना एका विहित कालमर्यादेत नवीन घरांची हमी दिली जाते. त्यांना तात्पुरत्या घरांमध्ये स्थलांतरित केले जात नाही. एरवी अशा पुनर्वसन प्रकल्पांमध्ये एवढ्या सहजासहजी नव्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतर होत नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांना अशा पारंपरिक आणि धोकापूर्ण प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा धारावीचा उल्लेख वारंवार केला जातो. चामड्याचे उद्योग, गारमेंट्स, मातीच्या भांड्यांचे उद्योग, पुनर्प्रक्रिया उद्योग, खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्याचे उद्योग असे विविध उद्योग-व्यवसाय या ठिकाणी केले जातात. त्यामुळेच धारावीचे पुनर्वसन म्हणजे केवळ नव्या आणि उंच इमारती बांधणे नव्हे तर लोकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणे आहे.

आव्हाने आणि संधी

अर्थातच पुढचा मार्ग आव्हानशून्य नाहीच. भूसंपादन, पुनर्वसन आणि वित्तपुरवठा यांसाठी काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी यांची गरज असेल. तसेच नकारात्मक राजकारणाचा प्रभावही सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा अडसर ठरत आहे. अदानी यांचे ‘की टू की’ आश्वासन हे एक योग्य दिशेने टाकलेले धाडसी पाऊल आहे.

‘की टू की’ गेमचेंजर ठरणार

-धारावीतील रहिवाशांसाठी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना नवीन घर मिळण्याची हमी.

- गतिमान संक्रमण हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकल्पांमध्ये दिरंगाईमुळे खर्च, सामाजिक अस्वस्थता आणि विश्वास गमावणे या नकारात्मक गोष्टी पसरतात.

-लोकांच्या गरजांना अग्रक्रम देऊन अदानी यांनी नफाकेंद्री विकासाकडून लोककेंद्री नागरी पुनरुत्थानाकडे आपला लंबक झुकवला आहे.

-धारावी पुनर्वसन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला तर झोपडपट्टी पुनर्वसनाच्या बाबतीत हा प्रकल्प केवळ फक्त भारतातच नव्हे तर जगभरात एक पथदर्शी प्रकल्प ठरेल.

-अर्थव्यवस्थेला नवीन ताकद देणे : सुनियोजित पुनर्वसनामुळे परिसराच्या आर्थिक क्षमता रुंदावतील आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल.

-अदानी समूह धारावीत दळणवळण, लोकोपयोगी सेवा आणि संपर्क यांच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणार आहे.

-जीवनशैलीत सुधारणा : नवीन गृहनिर्माण, उत्तम पायाभूत सुविधा आणि मलनिःसारणाची सुधारलेली स्थिती यांमुळे धारावीकरांच्या जीवनशैलीत स्वप्नवत बदल होईल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली