मुंबई

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

प्रतिनिधी

शौचालय घोटाळ्यात मेघा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने अडचणीत सापडलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजपनेते किरीट सोमय्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या अब्रूनुकसानीचा दाव्यात शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना ६ ऑगस्टला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनानेते संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू असतानाच राऊत यांनी किरीट सोमय्यासह त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटळ्या केल्याचा आरोप केला. मिरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून, त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेघा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून मिरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकार्‍यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता.

राऊत यांचे हे आरोप प्रतिमा मलीन करणारे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे असून, यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे, असा आरोप करत मेघा सोमय्यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला आहे. याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना समन्स बजावले होते.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप