मुंबई

आदित्य ठाकरेंच्या प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर या प्रकल्पांना रोखण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

प्रतिनिधी

एकनाथ शिंदे गटाचा पाठिंबा मिळवत भाजपने पुन्हा एकदा राज्यात सत्ता स्थापन केली आहे. या सत्ता बदलानंतर मुंबई महापालिकेवर कमळ फुलवणे हा भाजपचा मुख्य लक्ष आहे. तर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी ही भाजपकडून रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणारे सायकल ट्रॅक, समुद्राचे पाणी गोडे करणे या प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पवई तलावाभोवतीचा सायकल ट्रॅक, आश्रय योजनांतर्गत कर्मचाऱ्यांच्या घरांसाठीचा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वांकांक्षी प्रकल्पांना भाजपकडून लक्ष केले जाते आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला भाजपने सुरुवातीलाच तीव्र विरोध केला होता. आता राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर या प्रकल्पांना रोखण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

आश्रय योजनेंतर्गत कर्मचारी नऊ वसाहतींचा पुनर्विकास सुरू करण्यात आला आहे. त्यात सुमारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून केला जातो आहे. याबाबत भाजपने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना योजनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पालिका ३,३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पावर १,८०० कोटी रुपये अतिरिक्त खर्च करत आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे.

जनताच योग्य ते ठरवेल - किशोरी पेडणेकर

आता ते सत्तेत आले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील. मात्र निवडणुकीत मतदार ठरवणार आहेत, हे लक्षात घ्यावे. शिवसेनेने जे काही केले ते शहरासाठी चांगले होते की नाही हे जनता ठरवेल. आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीने शहरासाठी जे आवश्यक होते त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असे माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश