प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मुंबईत पुन्हा ‘हिट ॲण्ड रन’, वांद्रे येथील घटना

वांद्रे येथील अपघातात राजू जगदीश गुप्ता या ४८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : वांद्रे येथील अपघातात राजू जगदीश गुप्ता या ४८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी कारचालक पळून गेला. त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरू आहे.

तक्रारदार महिला ही वांद्रे येथे तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. मृत राजू गुप्ता ही व्यक्ती या तक्रारदार महिलेचा मामा असून तो त्यांच्यासोबत राहतो. काहीच काम नसल्याने तो भंगार गोळा करण्याचे काम करत होता.

शनिवारी सकाळी पाच वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. सात वाजता तो वांद्रे-वरळी यु ब्रिजखाली भंगार गोळा करत होता.

यावेळी एका भरवेगात जाणाऱ्या कारने त्याला धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यामुळे त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य