मुंबई

शरीर संबंधांना नकार दिल्यानंतर भडकलेल्या प्रियकराचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न

नवशक्ती Web Desk

देशात दिवसेंदिवस प्रेमप्रकरणातून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येचं प्रकरण ताजं असताना आता मुंबईत देखील एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ऐन वेळी आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी हस्तक्षेप केल्याने प्रेयसीचा जीव वाचला आहे. बुधवार (31 मे) रोजीची ही घटना असून प्रेयसीच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

वांद्रे येथील प्रेमी युगूलांचं आवडत ठिकाण असलेल्या बॅण्डस्टॅण्ड येथे बुधवार (31 मे) रोजी आरोपी प्रियकराने आपल्या प्रेयसीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तिचं डोकं जमिनीवर आदळलं. यानंतर तिला गटारात बुडवण्याचाही प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सध्या मारहाण झालेल्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

आरोपी तरुणाने तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी धर्मपरिवर्तन केलं. हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला, असं म्हणत प्रेयसीकडे शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. परुंतु प्रेयसीने नकार दिल्यावर त्याने तिला मारहाण केली, असं तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारील म्हटलं आहे.

लुबाना जावेद सुक्ते आणि आकाश मुखर्जी यांचं अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते, बुधवारी ते गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी इथे फिरुन आल्यानंतर संध्याकाळी वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे पोहचले. यानंतर आकाश लुबनाला मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्विकारल्यांच म्हणाला. धर्मपरिवर्तन केल्याचं प्रमाणपत्र तुझ्या काकीला दाखवून लग्नसाठी परवानगी घेऊनया असं त्याने प्रेयसीला सांगितलं. यानंतर प्रेयसीने त्याला उशिर झालाय घरी जाऊ असं सांगितल्यानंतर त्याचं वर्तन पुर्णपणे बदललं. त्याने तिला थोडा वेळ थांबालया सांगून शरीर संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीने त्याची मागणी धुडकावून लावली. यानंतर रागावलेल्या आकाशने तिचा गळा दाबला. तसंच तिच डोकं जमिनीवर आदळलं. तिला गटारात बुडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तिथे स्थानिकांची गर्दी झाली. यावेळी तरुणीने त्यांना तो आपल्याला मारहाण करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आकाशने समुद्राच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात आकाश मुखर्जी याला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मतचाचण्यांचे निष्कर्षही संदिग्ध

एकतेचा मंत्र जपावाच लागेल!

दक्षिण-मध्य मुंबईत शेवाळेंविरुद्ध देसाई

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

विशाल पवार यांच्या हत्येचा तपास सुरू; गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात झाला मृत्यू