मुंबई

मुंबईच्या घाटकोपरमधील धक्कादायक घटना ; रिक्षाचालकाने केला अनैसर्गिक अत्याचार

प्रवासी हा मद्यधुंद अवस्थेत असल्यानं रिक्षाचालकानं त्यांचा मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेत त्याला निर्जनस्थळी नेलं.

नवशक्ती Web Desk

मुंबईच्या घाटकोपर येथे एका मद्यधुंद प्रवाशावर एका विकृत रिक्षाचालकाने जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे. तसंच त्यानं या प्रवाशासोबत अनैसर्गिक सेक्स केला. दोघांमध्ये भाड्याचे पैसे देण्यावरुन वाद झाला. पुढे वादाचं रुपांतर भांडणात झालं. यावेळी प्रवासी हा मद्यधुंद अवस्थेत असल्यानं रिक्षाचालकानं त्यांचा मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेत त्याला निर्जनस्थळी नेलं.

मद्यधुंद अवस्थेत असलेला एक प्रवासी शनिवारी (3 जून) घाटकोपर येथून एका रिक्षात बसला. प्रवासी हा मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्याला कुठं जायचं हे सांगण्याच्या तो स्थितीत नव्हता. हा प्रवासी रिक्षाचालकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवत होता. रिक्षा चालकाला जवळपास तासभर फिरवल्यानंतर हा प्रवासी रिक्षातून उतरला. यावेळी रिक्षाचालकानं त्याच्याकडे 250 रुपये भाडं मागितलं. मात्र, पीडित प्रवाशाने रिक्षाचालकाच्या हातावर फक्त 100 रुपये टेकवले. यावेळी त्यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण झालं. यानंतर त्यानं पीडित प्रवाशाला रिक्षात बसवत निर्जनस्थळी एका गार्डनमध्ये नेलं. तिथं प्रवाशावर जबरदस्ती करत अनैसर्गिक सेक्स केला. टाइम्स ऑफ इंडियान. याबाबतचं वृत् दिलं आहे.

या नंतर रिक्षाचालकानं पीडित प्रवाशाला परत रिक्षात बसवलं आणि एटीएम सेंटरमध्ये नेलं. तिथे त्याला 200 रुपये काढायला सांगून त्याच्याकडून मोबाईल फोन आणि एटीएमकार्ड काढून घेतलं. यानंतर पीडित प्रवाशाला सोडून दिलं. पीडित प्रवाशाने मंगळवार (6 जून) रोजी पोलिसांत धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावेळी मला फक्त माझा मोबाईल फोन हवा आहे. आपल्यासोबत घडलेल्या घटनेमुळे आपल्या लाज वाटत असल्याचं पीडित प्रवाशाने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

आजपासून GST बचत उत्सव! पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा : स्वदेशी, स्वावलंबनावर भर; जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

राज्यात नवरात्रोत्सवाची धूम; ठाण्यात बाजारपेठांमध्ये गर्दी

भिवंडीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई