मुंबई

अरविंद केजरीवाल - उद्धव ठाकरेंची भेट ; केजरीवाल म्हणाले, 'या नात्याला...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट

प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "उद्धव ठाकरे हा वाघाचा मुलगा आहे. ते लढत असलेली लढाई जिंकणारच. उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या नात्याला आम्ही पुढे घेऊन जाऊ. " अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात आणला ते कौतुकास्पद होते." असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले. ते म्हणाले की, "देशामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई असून ती वाढतच चालली आहे. काही उद्योगपतींच्या भल्यासाठी केंद्र सरकार देशाला वेठीस धरत आहे. आम्हाला एकमेकांच्या विरोधात लढायचे नाही तर, सोबत मिळून काम करायचे आहे."

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप