मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक

अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जॉय बबलू चौधरी ऊर्फ जिकू दास नावाच्या एका बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. बोगस दस्तावेज सादर करून गोव्यातील पणजी शहरातून भारतीय पासपोर्ट मिळवून तो बँकॉकला गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी जॉय हा बँकॉकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. यावेळी त्याच्या पासपोर्टसह इतर दस्तावेजची पाहणी केली असता, त्याला लुकआऊट नोटीसवर ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. बांगलादेशातून भारतात पळून आल्यानंतर तो काही महिने कोलकाता येथे वास्तव्यास होता. तेथून तो गोव्याला गेला. तिथेच त्याने बोगस नावाने आधारकार्डसह इतर भारतीय दस्तावेज बनवून पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्याला भारतीय पासपोर्ट मिळाले होते.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल