मुंबई

डिसेंबरमध्ये बँक कर्मचारी संपावर; जाणून घ्या नेमकं कोणत्या दिवशी बँका बंद राहणार

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA)ने प्रस्तावित केलेल्या या संपामुळं आता ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

नवशक्ती Web Desk

डिसेंबरमहिन्यात अनेक दिवस बँकांचे कामकाज पूर्णतः बंद राहणार आहे. पुढील महिन्यात अनेक दिवस विविध बँकांमध्ये कर्मचाऱ्यांकडून संप पुकारला जाणार आहे. 'ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन'ने (AIBEA)याविषयी अधिसूचना जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे.

AIBEAने डिसेंबर 2023 मध्ये वेगवेगळ्या तारखांना सगळ्या बँकांमध्ये संप जाहीर केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकांचा हा संप 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत सुरु होईल. त्यामुळं बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरु होण्यापूर्वी नागरिकांनी याची माहिती घेणं फार गरजेचं आहे.

या दिवशी राहणार बँकांमधील कामकाज बंद

4 डिसेंबर 2023- स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँक

5 डिसेंबर 2023- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया

6 डिसेंबर 2023- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया

7 डिसेंबर 2023- इंडियन बँक आणि युको बँक

8 डिसेंबर 2023- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ (महाराष्ट्र)

9 आणि 10 डिसेंबर 2023- बँकांमध्ये शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी

11 डिसेंबर 2023- खासगी बँक

बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामागील मुख्य कारण म्हणजे बँकेत अजून कर्मचाऱ्यांची भरती करावी. यासोबतच बँकिंग क्षेत्रातील आऊटसोर्सिंगवर बंदी घालून कायमस्वरुपी नोकऱ्यांची संख्या वाढवावी. या प्रकरणाची माहिती देताना एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हटलं आहेत की, गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये खालच्या स्तरावर आऊटसोर्सिंगचे प्रमाण अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत तात्पुरते कामगार वाढल्याने ग्राहकांची वैयक्तिक माहितीही खूप धोक्यात आली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA)ने प्रस्तावित केलेल्या या संपामुळं आता ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.

4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान विविध बँकांमधील कामात व्यत्यय आल्याने लोकांची अनेक महत्त्वाची कामे रखडणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामाचं नियोजन करणं महत्वाचं आहे.

वर्गात मोबाईलला बंदी! जगातील निम्म्याहून अधिक देशांनी घेतला मोठा निर्णय; UNESCO अहवालातून उघड

मुंबईत वॉटर मेट्रो येणार? कल्याण-गेटवे ३४० किमी मार्ग; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त