मुंबई

गणेशोत्सव मंडळात ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन

प्रतिनिधी

लाडक्या गणरायाच्या आगमनाला फक्त १० दिवस शिल्लक असून ऑगस्ट महिन्यातील तिसऱ्या रविवारी गणेशोत्सव मंडळात बाप्पाचे ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. फोर्टचा राजा, बीडीडी चाळीचा राजा, माझगावचा मोरया, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा मोरया, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदयनगरचा राजा आदी मंडळांच्या मंडपात उत्साहात गणेशाचे आगमन झाले.

३१ ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून, या महिन्याच्या तिसऱ्या रविवारी गणेशोत्सव मंडळात बाप्पाचे ढोल-ताशाच्या गजरात आगमन झाले. गेल्या शनिवार, रविवारपासूनच गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईतील ३०हून अधिक मंडळांनी गणपती बाप्पाला मंडपात वाजत गाजत आणले.

दरम्यान, गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. गणपती आगमन ते विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, चौपाट्यांवरील सुविधा आदी नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या मंडळांत बाप्पाचे आगमन

फोर्टचा राजा, बीडीडी चाळीचा राजा, माझगावचा मोरया, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा मोरया, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदयनगरचा राजा, डोंगरीचा राजा, परळचा विघ्नहर्ता, कुंभारवाड्याचा गणराज, अॅण्टोपहिलचा महाराजा, कुलाब्याचा सम्राट, सुंदरबागचा राजा, मुलुंडचा विघ्नहर्ता आदी मंडळांच्या मंडपात वाजत-गाजत गणेशाचे आगमन झाले.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम