मुंबई

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करताना सावधान!

कमल मिश्रा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी तुमचे तिकीट किंवा पास दोनदा तपासा. मध्य रेल्वेने १९ ते ३१ मे या कालावधीत एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवासाची समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे आणि कायदेशीर प्रवाशांसाठी एकूण प्रवास अनुभव सुधारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

“या मोहिमेदरम्यान, दररोज सकाळी ७.४३ ते ११.२८ पर्यंतच्या एकूण ४५ सेवांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सहकार्याने १६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या मध्य रेल्वेवर ५६ एसी लोकल धावत असून यामध्ये ५० हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा सुरू असते.

मोहीम सुरू झाल्यापासून, आढळलेल्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. १९ मे रोजी २५७, २० मे रोजी २४५ आणि २१ मे रोजी २९६ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे २३ मे रोजी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची २७२ प्रकरणे आढळून आले.

प्रवाशांनी दादर, कुर्ला, घाटकोपर आणि ठाणे यांसारख्या स्थानकांवर गर्दीच्या वेळेत द्वितीय श्रेणीच्या डब्यांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना या समस्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शिवाय, एसी डब्यांचे वारंवार नॉन-एसी डब्यांमध्ये रूपांतर होत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली, जी नित्याचीच झाली आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाला भाड्यातील फरक परत करणे किंवा बाधित प्रवाशांना योग्य नुकसान भरपाई देण्यासारखे पर्याय शोधण्याची विनंती केली.

मध्य रेल्वेवरील एसी लोकल - ५६

दररोज प्रवास करणारे - ५० हजार

दररोज पकडली जाणारी प्रकरणे - १७०

मोहीम सुरू झाल्यानंतरची दररोजची प्रकरणे - २७०

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?