मुंबई

फुकट्या प्रवाशांवर बेस्टची कारवाई

प्रतिनिधी

विनातिकीट अथवा अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांविरोधात बेस्ट परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला जातो. जानेवारी ते जुलै २०२१ या ७ महिन्यात २३ हजार १०० फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १४ लाख ५८ हजार ३२६ रुपये दंड वसूल केल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा यासाठी वातानुकूलित बस प्रवाशांच्या सेवेत आणल्या आहेत. आरामदायी व गारेगार प्रवासाची सुविधा उपलब्ध होत असताना अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

प्रज्वल, रेवण्णा नव्याने अडचणीत

‘वंदे भारत मेट्रो’ पश्चिम रेल्वेवर धावणार? मुंबईत पहिली ट्रेन जुलैमध्ये येण्याची शक्यता

केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर विचार होऊ शकतो; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

अकोला : दोन कारची भीषण टक्कर, ६ जण ठार ; आमदार सरनाईकांच्या नातलगांचा मृतांमध्ये समावेश