मुंबई

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी महापालिका, सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्षन कंपनी आदीं विरुद्ध वयाच्या ८१व्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे मित्राने थेट पंतप्रधान मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली व सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Swapnil S

भाईंदर : स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी महापालिका, सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्षन कंपनी आदीं विरुद्ध वयाच्या ८१व्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बालपणीचे मित्राने थेट पंतप्रधान मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली व सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित मीरारोड पूर्वेतील नवघर येथील २८१० चौ.मी. जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या दीर्घकाळच्या वादात बनावट दस्तऐवज, जमीन व्यवहार आणि बांधकाम परवानग्यांबाबत गंभीर आरोप व तक्रारी पंतप्रधान मोदी यांचे बालपणीचे मित्र अजगरभाई वोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रत्यक्ष भेटून तक्रार केली व सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ची बांधकाम परवानगी २०१९ मध्ये रद्द केली होती. मात्र, त्यानंतर २०२६ मध्ये आ. मेहता यांचे नातलग आर्किटेक्ट यश कोठारी यांच्या माध्यमातून पुन्हा नव्याने बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जमिनीशी संबंधित कथित बनावट दस्तऐवज २०११ च्या सुमारास तयार केले. या प्रकरणी २०१५ मध्ये गुन्हा दाखल झाल्याचा दावा असून, २०२६ मध्ये सीआयडीचा अहवाल प्राप्त झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जमिनीचे कथितरीत्या दोन भाग करण्यात आले आणि त्यापैकी एका भागाशी ‘स्वयम बिल्डर्स’, तर दुसऱ्या भागाशी ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’चा संबंध जोडण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित यंत्रणांनी ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ला फायदा होईल अशा पद्धतीने कारभार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र, हे आरोप तक्रारदारांचे असून त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. संबंधित कंपनी, आमदार नरेंद्र मेहता, महापालिका प्रशासन, महसूल विभाग तसेच इतर संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा