मुंबई

Bhayandar : रेल्वे कंत्राट वादावरून ३ भावांवर जीवघेणा हल्ला; १ आरोपी अटकेत

भाईंंदर पश्चिम येथील धक्का परिसरात रेल्वे कंत्राटाच्या कामावरून झालेल्या वादातून तीन भावांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

Swapnil S

भाईंंदर: भाईंंदर पश्चिम येथील धक्का परिसरात रेल्वे कंत्राटाच्या कामावरून झालेल्या वादातून तीन भावांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिघेही भाऊ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राई गावातील रहिवासी असलेले रुपेश पाटील हे आपल्या भावांसोबत रेल्वेची कंत्राटी कामे करतात. मंगळवारी संध्याकाळी ते आपल्या भावांसह, भूषण आणि नितेश पाटील, तसेच मुलगा यश आणि सहकारी संकेत म्हात्रे यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या उप-कंत्राटदाराला, जयेश मांजलकर याला, रुपेश यांनी माझ्या कंपनीला रेल्वेने बहिष्कृत केले आहे, असे खोटे का सांगत आहेस? अशी विचारणा केली. या विचारणेचा राग आल्याने जयेश मांजलकर, महेश शेट्टी, राहुल शर्मा आणि त्यांच्या इतर ४-५ साथीदारांनी पाटील बंधूंवर लोखंडी रॉड, चॉपर आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात भूषण आणि नितेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर रुपेश पाटील यांनाही मारहाण झाली.

जखमी अवस्थेत पाटील बंधू तिथून निघून जात असताना, हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. या घटनेनंतर, आरोपींनी पाटील बंधूंचा जखमी अवस्थेत व्हिडिओ काढून, सांगा किती खंडणी पाहिजे? अशी विचारणा करत खंडणीचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी राहुल शर्मा याने पोलीस ठाण्यात जाऊन पाटील बंधूंविरोधातच खंडणीची खोटी तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग