मुंबई

BMC चा अर्थसंकल्प ६५ हजार कोटी पार? मुंबईकरांच्या पदरी आशा की निराशा? सोमवारी होणार सादर

मुंबई पालिकेचा सन २०२५ - २६ चा अर्थसंकल्प सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पात ८ ते १० टक्क्यांनी वाढ होणार असून ६५ हजार कोटींच्या पार अर्थसंकल्प असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई

मुंबई पालिकेचा सन २०२५ - २६ चा अर्थसंकल्प सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सन २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पात ८ ते १० टक्क्यांनी वाढ होणार असून ६५ हजार कोटींच्या पार अर्थसंकल्प असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतीही कर वाढ होणार नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतावर भर देण्यात येणार असल्याचे समजते.

मुंबई पालिकेचा सन २०२५ - २६ चा अर्थसंकल्प सोमवार ३ फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई, कुठलीही कर वाढ नसलेला यंदाचा अर्थसंकल्प असेल, अशी आशा करदात्या मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. पालिका रुग्णालयात "शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण" राबविण्यात येणार असल्याचे समजते. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, कोस्टल रोड, लिंक रोड, विकासकामे, सोयीसुविधा यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हजारो कोटींची तरतुदी करण्यात येणार असल्याचे समजते.

फायर ब्रिगेडकडून मोठा महसूल जमा!

पालिकेची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून गेल्या वर्षी २०० कोटींचा महसूल जमा झाला होता. तर २०२४ - २५ मध्ये ४९० कोटी महसूल जमा झाला आहे. तर २०२५ - २६ मध्ये अग्निशमन दलाच्या माध्यमातून ८०० कोटी रुपये महसूल मिळेल, अशी अपेक्षा पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

बेस्टला काय मिळणार?

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे तीन हजार कोटींची मागणी केली आहे. त्यामुळे सन २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाच्या पदरी काय पडणार? याकडे बेस्टचे डोळे लागले आहेत.

अडीच हजारांहून अधिक हरकती!

मुंबई पालिकेच्या सन २०२५ - २६ च्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, काय करू नये यासाठी २,७०३ मुंबईकरांनी पालिकेला विविध प्रकारच्या सूचना केल्या आहेत. यात बेस्ट उपक्रमाच्या बळकटी संदर्भात सर्वाधिक २,०४८ सूचना प्राप्त झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली