पेड न्यूज, समाजमाध्यमांवर पालिकेचा वाॅच प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

पेड न्यूज, समाजमाध्यमांवर BMC चा वाॅच! आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

मुंबई महापालिका निवडणुकीत पेड न्यूजच्या तक्रारी, एखाद्या प्रकरणाची चौकशी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत पेड न्यूजच्या तक्रारी, एखाद्या प्रकरणाची चौकशी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी केली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच २९ महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग्यरीत्या पार पडणे, राजकीय पक्ष, उमेदवारांना समान संधी मिळणे तसेच निवडणूकविषयी इलेक्ट्रॉनिक मीडियात जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, विविध प्रसारमाध्यमातील वृत्तांकनात आचारसंहितेचे पालन केले की नाही, समाजमाध्यम संदर्भात देखरेख ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही पत्रव्यवहार असल्यास मुंबई महानगरपालिका मुख्यालय, विस्तारित इमारत, तळ मजला, जनसंपर्क विभाग याठिकाणी करण्यात यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. आयुक्तांनी पक्षप्रतिनिधींशी बैठक घेतली. मुंबईत २३ निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग