(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : आंबेडकर भवन पाडकाम तपास SIT कडे वर्ग करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला

दादर येथील ऐतिहासिक बुद्धभूषण मुद्रालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्या करणाचा तपास संत गतीने सुरू असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

Swapnil S

मुंबई : दादर येथील ऐतिहासिक बुद्धभूषण मुद्रालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्या करणाचा तपास संत गतीने सुरू असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हा तपास एसआयटी किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याबाबत विचार करण्याच्या निर्देश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

डॉ. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे जून २०१६ मध्ये पाडकाम करण्यात आले. या घटनेच्या चौकशीसाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते तक्रारदार आनंद आंबेडकर आणि मूळ विश्वस्तांचे जबाब अद्याप नोंदवले नसल्याचे समोर आल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Cooking Tips : भाजी चविष्ट बनवण्याचे गुपित; मीठ-मसाला घालण्याची योग्य वेळ जाणून घ्या

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम

अमेरिकेतही शिवाली परबचा देसी स्वॅग! पिवळ्या पंजाबी ड्रेसमधील गोड फोटो पाहून चाहते फिदा

मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी संशोधन केंद्र! स्वतंत्र शब्दकोशाची निर्मिती होणार

उल्हासनगरात धोकादायक इमारतीच्या पाडकामात निष्काळजीपणा; ढिगारा थेट शेजारील इमारतीच्या घरात; चिमुरडी थोडक्यात बचावली