मुंबई

प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला तर प्रियकरावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू

Swapnil S

मुंबई : गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर रिक्षाचालकाने त्याच हत्याराने स्वत:ला दुखापत करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला तर प्रियकरावर कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

मृत प्रेयसीचे नाव मयनाबाई गिरी तर आरोपी प्रियकराचे नाव बाबूराव मोरे आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कांदिवलीतील आकुर्ली रोड, क्रांतीनगरात घडली. मयनाबाई आणि बाबूराव गेल्या तीन वर्षांपासून ते दोघेही लिव्ह अँड रिलेशनशीपमध्ये राहत होते. मयनाबाई आणि बाबूराव यांच्यात तिच्या पहिल्या पतीवरून भांडण झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात मयनाबाईच्या गळ्यावर सुरीने वार केले, त्यानंतर त्याने त्याच सुरीने स्वत:वरही वार केले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन