मुंबई

मुंबईतील सिमेंटचे रस्ते खड्डेमुक्त होणार

प्रतिनिधी

मुंबईतील सिमेंटचे रस्ते आता खड्डेमुक्त होणार आहे. सिमेंट रस्त्यावर खड्डा पडला तर पूर्ण रस्ता खोदण्याची गरज नाही. ज्याठिकाणी खड्डा पडला तो पॅच ‘अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग’ने बुजवणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे या नवीन तंत्रज्ञानामुळे बुजवलेल्या खड्डा १० ते १५ वर्षे टिकेल. चर्चगेट येथील बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग या सिमेंट रस्त्यावरील खड्डे अवघ्या दोन तासांत बुजवण्यात आले असून पहिला प्रयोग यशस्वी झाल्याचे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता विशाल ठोंबरे यांनी सांगितले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रयोग यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

मुंबईत एक हजार किलोमीटर रस्ते हे सिमेंट काँक्रीटने तयार करण्यात आलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे पडले तर ते डांबरचा उपयोग करून खड्डे बुजवले जातात. यात बराच वेळ जातो आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच डांबरने रस्ते बुजविल्यानंतर वर्षभरानंतर पुन्हा तिथे खड्डे पडलेले पुन्हा पाहायास मिळतात. यावरच रामबाण उपाय विशाल ठोंबरे यांनी शोधून काढला असून त्यांच्या संशोधनाद्वारे एकदा सिमेंटच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले की ते १५ वर्ष त्या सिमेंटच्या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत