मुंबई

मऊ-कोच्चुवेली दरम्यान २८ उन्हाळी स्पेशल गाड्या; अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Swapnil S

मुंबई : उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून, अनेकजण गावी जातात. त्यामुळे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त उन्हाळी स्पेशल २८ गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी उन्हाळी सुट्टीत लोक आपल्याला गावी जातात. गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मऊ दरम्यान २८ स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत.

स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या

सीएसएमटी - मऊ विशेष (४ फेऱ्या)

  • ०१०७९ विशेष गाडी १० एप्रिल आणि १ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १०. ३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल.

  • ०१०८० विशेष गाडी १२ एप्रिल आणि ३ मे रोजी मऊ येथून १.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

  • 'या'ठिकाणी थांबणार : दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, गोविन्दपुरी, फतेहपूर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आज़मगड.

एलटीटी-कोच्चुवेली

साप्ताहिक विशेष (२४ फेऱ्या)

  • ०१४६३ साप्ताहिक विशेष ११ एप्रिल ते २७ जुनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८.४५ वाजता कोच्चुवेली येथे पोहोचेल.

  • ०१४६४ साप्ताहिक विशेष कोच्चुवेली १३ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर शनिवारी ४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ९.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

  • 'या' ठिकाणी थांबणार : ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एर्नाकुलम जं., कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं.

तिकीट आरक्षण सोमवारपासून

उन्हाळी विशेष ट्रेन ०१०७९ आणि ०१४६३ साठी विशेष शुल्कावर बुकिंग सोमवार, ८ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाऊनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास