मुंबई

मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर हे बुधवारी निकाल देणार आहेत. या निकालाच्या आधी नार्वेकर यांनी 'वर्षा'वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : bआमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील विकासकामे असतात. मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक ३ तारखेला नियोजित होती. पण, मला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे मी तेव्हा भेटू शकलो नाही. कुलाबाच्या पुलाबाबत मला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती. तसेच दक्षिण मुंबईतील आठ रस्त्यांचे प्रकरण होते. हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, असा खुलासा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. उद्धव ठाकरेंचे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर हे बुधवारी निकाल देणार आहेत. या निकालाच्या आधी नार्वेकर यांनी 'वर्षा'वर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी मुख्यमंत्री भेटीबाबत खुलासा केला. असे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत. विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना कोणत्या कामासाठी भेटू शकतात, याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी. जे स्वतः माजी मुख्यमंत्री आहेत, ज्यांना विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती आहे, त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे, असेही नार्वेकर म्हणाले.

आज मी व्हीआयपी लाऊंजमध्ये अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो. ती काय राजकीय भेट होती का? मी अनेकदा अनेकांना भेटतो. ती काय राजकीय भेट असते का? मी त्यांना भेटू नये असा अर्थ होतो का? असे सवाल राहुल नार्वेकर यांनी केले. आरोप जेव्हा बिनबुडाचे होतात, त्यावेळी त्या व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी आरोप होत असतात, असेही ते म्हणाले.आमदार अपात्रता प्रकरणात मी सर्वांचा विचार करून निर्णय घेईन. राज्यातील जनतेला न्याय देण्याचा निर्णय घेईन. यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा अधिकार सर्वाना आहे. पण माझ्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. निकाल दिलेल्या वेळेतच घेऊ, असेही नार्वेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक