मुंबई

काँग्रेस नेतृत्वात प्रचंड उर्मटपणा-निरुपम

काँग्रेसच्या कारवाईनंतर संजय निरुपम यांनी शुक्रवारी आपण आपला पुढचा निर्णय घोषित करणार असल्याचे सांगितले. मिलिंद देवरा यांच्याप्रमाणे तेही शिंदे गटात जातील, असा अंदाज आहे.

Swapnil S

मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी केल्याच्या एका दिवसानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला आणि असा दावा केला की पक्षाच्या नेतृत्वात प्रचंड उर्मटपणा आहे. बेशिस्त वर्तन आणि पक्षविरोधी वक्तव्याच्या तक्रारींची दखल घेत बुधवारी सायंकाळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती.

या पार्श्वभूमीवर मुंबईत एका पत्रकार परिषदेत निरुपम यांनी असा दावा केला की, काँग्रेस आता इतिहासजमा झाली आहे आणि तिला भविष्य नाही. काँग्रेसमध्ये पाच सत्ताकेंद्रे आहेत - गांधी कुटुंबातील तीन सदस्य, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल. काँग्रेसची नेहरूवादी धर्मनिरपेक्षता आता कालबाह्य झाली आहे. काँग्रेसला आता गंज चढला आहे, असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडी हे तीन आजारी घटकांचे विलीनीकरण आहे, असेही ते म्हणाले.

शिंदे गटात जाणार?

काँग्रेसच्या कारवाईनंतर संजय निरुपम यांनी शुक्रवारी आपण आपला पुढचा निर्णय घोषित करणार असल्याचे सांगितले. मिलिंद देवरा यांच्याप्रमाणे तेही शिंदे गटात जातील, असा अंदाज आहे. दरम्यान, भाजपचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी निरुपम यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध केला आहे. काँग्रेसने फेकलेला कचरा आपल्या घरात आणू नका, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी निरुपम यांच्यावर हल्ला केला.

शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर संजय निरुपम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते. २०१९ च्या निवडणुकीत वायव्य मुंबईतून त्यांनी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत