मुंबई

राज्य मंडळाचे 'कॉपीमुक्त अभियान'; दहावी, बारावी परीक्षांसाठी केली 'ही' तयारी

प्रतिनिधी

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंडळाने कॉपी प्रकरणावर नियंत्रण मिळवून परीक्षांतर्गत गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या दरम्यान पेपरफुटी होऊ नये, म्हणूनही राज्य मंडळाने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये 'कॉपीमुक्त अभियान' राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण केले.

या अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच, राज्याचे 'नोडल अधिकारी' म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच 'समन्वयक अधिकारी' म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच हे अभिनय राबवण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करून यासंदर्भात एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी, अशा सूचाना देण्यात आल्या आहेत.

तसेच, परीक्षा केंद्राजवळील १०० मीटर अंतरावर झेरॉक्स दुकाने बंद राहणार आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, तसेच १४४ कलम सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे. हे अभियान राबविण्यासाठी परीक्षेपूर्वी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर कोणती कार्यवाही करावी, या संदर्भात राज्यमंडळाने नुकतेच परिपत्रक जारी केले.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?