संग्रहित छायाचित्र 
मुंबई

वर्षा गायकवाड यांना कोर्टाचा दिलासा; खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना बुधवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना बुधवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी फेटाळून लावली. वर्षा गायकवाड यांनी प्रचारात खोटी आणि दिशाभूल करणारी आश्वासने दिली या दाव्यात ठोस पुराव्यांचा अभाव असल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्याविरुद्ध १६ हजार ५१४ मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विजयावर अपक्ष उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला आणि उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. शर्मिला देशमुख यांच्या समोर दीर्घ सुनावणी झाली.

याचिकाकर्त्यांचे आरोप

निवडणुकीत हँडबिलावर मुद्रक, प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे. त्या निकषांची पूर्तता गायकवाड यांनी केली नाही. त्यांनी जाहिरात पत्रकांद्वारे खोटी आश्वासने दिली. मतांच्या बदल्यात मतदारांना पैसे वाटण्यात आले, असे आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते. याला वर्षा गायकवाड याचे वकील ॲड. तेजस देशमुख यांनी जोरदार आक्षेप घेतला. याचिकेत पुराव्यांचा अभाव आहे. तसेच प्रचारात दिलेल्या खोट्या आश्वासनांचे स्वरूप स्पष्ट करण्यात याचिका अपयश ठरली आहे. लाचखोरीचा दावा केला असला तरी त्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही व्हिडीओ जोडलेले नाहीत, असा युक्तिवाद ॲड. देशमुख यांनी केला.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध