मुंबई

राणी बागेतील 'क्रॉक ट्रेल' ; पाण्याच्या स्वच्छतेसाठी एक कोटींचा खर्च

प्रतिनिधी

मुंबई : राणी बागेत पर्यटकांना मगर, सुसरची धमाल मस्ती अनुभवता यावी यासाठी क्रॉक ट्रेल ( तळे) सुरू करण्यात आले आहे. या क्रॉक ट्रेल मध्ये साठवणूक करण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता करणे गरजेचे असते. यासाठी पाण्याच्या स्वच्छतेसाठी मशीन बसवण्यात आली असून, वर्षांला एक कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात मे महिन्यांत पर्यटक आणि मुलांसाठी उद्यानातील 'क्रॉक ट्रेल' (मगर आणि सुसर साठीचे मोठे तळे) पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना मगर आणि सुसर पाहण्याची संधी उपलब्ध झाली असून, मगर व सुसर प्रदर्शनीत बसवण्यात आलेली जीवन समर्थन प्रणाली ही संपूर्ण आशिया खंडातील अशी १० दशलक्ष लिटर पाणी स्वच्छ करणारी मशीन बसवण्यात आली आहे.

रविवार ७ मे पासून उद्यानातील 'क्रॉक ट्रेल'मध्ये तीन मगर आणि दोन सुसर सोडण्यात आले आहेत. प्रशासनाने या तळ्यात मगरींसाठी आणि सुसरसाठी दोन वेगवेगळे भाग तयार केले आहेत. त्यामुळे पर्यटकांना एकाचवेळी दोन्ही प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे. तसेच पाण्यात पहुडलेल्या मगर आणि सुसर पर्यटक तळ्याकाठी बनविलेल्या 'डेक'वरूनही पाहू शकतात. तसेच या प्राण्यांच्या पाण्याखालील हालचाली पर्यटक टीपू शकतात.

१० दशलक्ष लिटर पाणी स्वच्छ करणारी मशीन

१० लक्ष लीटर पाणी स्वच्छ करणारी प्रणाली असून, प्रणाली मध्ये प्रोटीन स्किम्मर इंडस्ट्रियल ग्रेड एयर कोनप्रेसर, ओझोन जनरेटर आणि यू. व्ही. मशीन अशा यंत्र सामुग्री बसविण्यात आल्या आहेत. पाण्याची गुणवत्ता राखता यावी याकरता या यंत्र सामुग्रीचे योग्य पद्धतीने प्रचालन होणे गरजेचे आहे. अन्यथा याची योग्यप्रकारे देखभाल न झाल्यास पाण्याची गुणवत्ता खराब होईलच व संपूर्ण यंत्रणाही बंद पडू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन