मुंबई

अल्पवयीन सावत्र मुलीला क्रूरतेने वागणुक; सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल

दोघांचे पटत नसल्याने त्यांनी २०१६ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला

नवशक्ती Web Desk

मुंबई : दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीपासून झालेल्या १० वर्षांच्या अल्पवयीन सावत्र मुलीचा मानसिक व शारीरिक छळ तसेच क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी सावत्र आई कविता हितेश भानुशाली हिच्याविरुद्ध नवघर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच आरोपी आईची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

मुलुंडमध्ये राहणाऱ्या तक्रारदाराने २०१२साली माधुरीसोबत लग्न केले. मात्र दोघांचे पटत नसल्याने त्यांनी २०१६ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतर १० वर्षांची मुलगी वडिलांसोबत राहत होती. २०१७मध्ये त्यांचे कवितासोबत दुसरे लग्न झाले. कविता हिचेही पहिले लग्न तुटले असून तिलाही १० वर्षांची मुलगी आहे. मात्र पती-पत्नीमध्ये सारखे खटके उडत असत. अखेर पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी मामाकडे गेल्यानंतर सावत्र आई तिचा छळ करत असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान कविताने तिचा २७ एप्रिल २०१८ ते २९ जुलै २०२३ या कालावधीत अनेकदा मानसिक व शारीरिक छळ केला होता. तिला क्रुरतेने वागणुक दिली होती. हा प्रकार समजताच कविता भालुशालीविरुद्ध पोलिसांनी भादवीसह अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती