मुंबई

'सोशल मिडीयावर लॅपटॉप खरेदी-विक्रीच्या फसव्या जाहिराती

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : सोशल मिडीयावर लॅपटॉप खरेदी-विक्रीची जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. आकिब हुसैन सय्यद आणि यश संदीप गोरीवाले अशी या दोघांची नावे असून, अकिब हा कटातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदारांना काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर लॅपटॉप खरेदी-विक्रीची एक जाहिरात दिसली होती. या जाहिरातीवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांच्याशी लॅपटॉपचा व्यवहार करून त्यांना एका दुकानात पाठविले होते. त्यापूर्वी त्याने त्याने त्यांच्याकडून ऑनलाईन पेमेंट घेतले होते; मात्र दुकानात गेल्यानंतर संबंधित व्यापार्‍यांना त्यांना लॅपटॉपचे पेमेंट मिळाले नसल्याचे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदाराने डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन