मुंबई

तिसऱ्या दिवशीही घसरण; सेन्सेक्स ८४४ अंकांनी कोसळला

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ८४३.७९ अंक किंवा १.४६ टक्के घसरुन ५७,१४७.३२वर बंद झाला.

प्रतिनिधी

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा तिसऱ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पुन्हा निधी काढून घेण्यात येत असल्याने सेन्सेक्स तब्बल ८४४ अंकांनी कोसळला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ८४३.७९ अंक किंवा १.४६ टक्के घसरुन ५७,१४७.३२वर बंद झाला. दिवसभरात तो ९४०.७१ अंक किंवा १.६२ टक्के घसरला होता. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २५७.४५ अंक किंवा १.४९ टक्के घसरुन १६,९८३.५५वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात घसरण झाली. तर ॲक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये घट तर शांघायमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत नकारात्मक वातावरण होते. अमेरिकन बाजारात सोमवारी घसरण झाली होती. भू-राजकीय घडामोडींमुळे गुंतवणूकदार धोका पत्करण्यास तयार नाहीत. उद्या जाहीर होणारा महागाई दर आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या वित्तीय निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. जागतिक गुंतवणूक संस्थांच्या तुलनेत देशांतर्गत गुंतवणूकर आक्रमकपणे विक्री करत नाहीत, असे विनोद नायर, हेड ऑफ रिसर्च, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.५९ टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव ९३.७० अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी मुंबई शेअर बाजारात २१३९.०२ कोटींच्या समभागांची विक्री केली.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी