मुंबई

पुनर्विकासासाठी धारावीकर एकवटले..! धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ रहिवाशांची घोषणाबाजी

धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ बुधवारी सायंकाळी धारावी पुनर्विकास संघाच्या वतीने शक्ती विनायक मंदिर येथील ९० फुटी रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला

Swapnil S

मुंबई : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ बुधवारी सायंकाळी धारावी पुनर्विकास संघाच्या वतीने शक्ती विनायक मंदिर येथील ९० फुटी रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी पेढे वाटप करून धारावी पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि काम जलद गतीने व्हावे यासाठी घोषणाबाजी देखील दिली.

राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी धारावीतील विविध विभागांमध्ये सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे या प्रकल्पाच्या विरोधात काही मोजक्या आंदोलकांकडून विरोध प्रदर्शन करण्यात आले. मात्र या आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश आंदोलक हे बाहेरील असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच धारावी मधील मूळ नागरिक या आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. यामुळे आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी या आंदोलनात हे सहभागी झाले असल्याचे मतही काही नागरिकांनी व्यक्त केले.

"धारावीचा पुनर्विकास झाल्यास येथील नागरिकांना हक्काची पक्की घरे उपलब्ध होतील. यामुळे धारावीवासियांचा पुनर्विकास प्रकल्पाला पाठिंबा आहे. मात्र काही जण खोटे आंदोलन करून हा प्रकल्प थांबवू इच्छित आहेत. त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी.

- राजीव कुमार चौबे, धारावी पुनर्विकास संघ

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला