मुंबई

पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये डिजिटल डिस्प्ले

Swapnil S

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांना उत्तम रेल्वे प्रवास देण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यानुसार पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये मुंबईकरांसाठी पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवले आहेत.

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेकच्या मुंबई सेंट्रल येथील ईएमयू कारशेडने नवीन हेड कोड डिस्प्ले सादर केला आहे. मोटार डब्यांच्या बाजूला पटल प्रणाली यशस्वीपणे सुरू झाली आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनच्या गंतव्यस्थानाची स्पष्ट आणि त्वरित ओळख यातून मिळणार आहे. यामुळे जेव्हा गार्ड मूळ स्थानकावर त्याच्या कॅबमध्ये ट्रेनचा क्रमांक फीड करेल तेव्हा प्रवासाचे सर्व तपशील बाजूला लोकल डब्यावर बसवलेल्या पॅनोरमा डिजिटल डिस्प्लेवर सर्व माहिती दिसेल. डिजिटल डिस्प्ले ३ सेकंदांच्या अंतराने भाषा बदलून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये ट्रेनचे गंतव्यस्थान दर्शविणार आहे. याशिवाय ते डिस्प्ले मोड जलद (F) किंवा स्लो (S) आणि ट्रेन १२-डब्बे किंवा १५-डब्बा ट्रेन आहे, याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

एका रेकमध्ये डिस्प्ले सिस्टीम

सध्या एका रेकमध्ये डिस्प्ले सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रत्येक बाजूला चार डिजिटल डिस्प्ले असलेले एकूण आठ डिजिटल डिस्प्ले आहेत. जे आवश्यक प्रवास माहिती तपशीलवार देतात. प्रवाशांचा प्रतिसाद सकारात्मक लाभल्यास भविष्यात इतर रेकमध्ये ते स्थापित करण्यात येणार आहेत.

डिजिटल डिस्प्लेची वैशिष्ट्ये

- डिजिटल डिस्प्ले फुल एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) आहेत.

- डिस्प्ले कडक काचेने संरक्षित आहेत

- डिस्प्ले स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट सेन्सरद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो जेणेकरून मजकूर ५ मीटरपर्यंतच्या अंतरावरून स्पष्टपणे दिसेल.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला