(संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

गणेशोत्सव आला तरी रस्ते खड्डेमयच! मतदारसंघातील विषयांवर पालिका आयुक्तांकडे तक्रार

गणेशोत्सवाला सुरुवात होणार असताना अद्याप रस्ते खड्डेमय आहेत, यासह मतदारसंघातील विषयांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवाला सुरुवात होणार असताना अद्याप रस्ते खड्डेमय आहेत, यासह मतदारसंघातील विषयांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली.

जी/दक्षिण वरळी विभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडेल आहेत. काही विभागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विभागातील डिलाइल पूल, स्मशानभूमीचे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. असे असताना अजूनही मुंबईतील रस्त्यावर खड्डे आहेत. हे खड्डे गणेशोत्सवाआधी बुजवणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर व्हायला हवे, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. जी/दक्षिण वरळी विभागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. काही विभागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नसल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच विभागातील डिलाइल पूल, स्मशानभूमीचे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.मुंबादेवी परिसराच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मंदिराच्या मागे पार्किंग उभारण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे या ठिकाणचे पार्किंग हटवा आणि भक्त निवास बांधा असे आवाहनही त्यांनी केले. लिपिक पदासाठी अट शिथील करण्याची मागणीमुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या लिपिक भरतीसाठी पहिल्या प्रयत्नात दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार