बनावट ट्रॅफिक ई-चलन, सिम हायजॅकपासून सावध राहा; सायबर पोलिसांचा इशारा 
मुंबई

बनावट ट्रॅफिक ई-चलन, सिम हायजॅकपासून सावध राहा; सायबर पोलिसांचा इशारा

सायबर गुन्हेगार ट्रॅफिक पोलिसांच्या नावावर ‘व्हॉट‌्सॲॅप’वर बनावट संदेश पाठवत आहेत. या संदेशांमध्ये घातक लिंक असतात. हे संदेश अज्ञात क्रमांकावरून आलेले असतात. ज्यात पाठवणारा स्वतःला ट्रॅफिक पोलीस म्हणून दाखवतो.

Swapnil S

सोमेंद्र शर्मा / मुंबई

नागरिकांना बनावट ट्रॅफिक ई-चलन आणि बनावट क्रेडिट कार्ड ऑफरच्या माध्यमातून होणाऱ्या सिम हायजॅक फसवणुकीबाबत सावधानतेचा इशारा सायबर गुन्हे शाखेने दिला आहे.

सायबर गुन्हेगार ट्रॅफिक पोलिसांच्या नावावर ‘व्हॉट‌्सॲॅप’वर बनावट संदेश पाठवत आहेत. या संदेशांमध्ये घातक लिंक असतात. हे संदेश अज्ञात क्रमांकावरून आलेले असतात. ज्यात पाठवणारा स्वतःला ट्रॅफिक पोलीस म्हणून दाखवतो.

‘ट्रॅफिक फाइन’ किंवा ‘आरटीओ चलन’ अशा संशयास्पद नावांची एपीके फाइल्स, वैयक्तिक यूपीआय आयडीवर पैसे भरण्याची विनंती आणि .gov.in ने न संपणाऱ्या किंवा parivahan.gov.in शी संबंध नसलेल्या वेबसाइट लिंक असतात.

नागरिकांनी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी एपीके फाइल डाऊनलोड करू नये आणि वैयक्तिक यूपीआय हँडलवर पैसे भरू नयेत,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ‘फसवे लोक आकर्षक क्रेडिट कार्ड ऑफर देत पीडितांशी संपर्क साधतात. बँक अधिकाऱ्यांचे रूप घेऊन पीडितांकडून महत्त्वाची माहिती गोळा करतात.

बनावट कागदपत्रांचा वापर करून ते टेलिकॉम कंपनीकडे ‘सिम स्वॅप’ची मागणी करतात. एकदा नवीन सिम फसवणूक करणाऱ्याच्या ताब्यात गेल्यावर, त्यांना पीडिताच्या बँक, यूपीआय आणि कार्डशी संबंधित सर्व ओटीपी आणि अलर्ट मिळतात.

काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’

भाजप-काँग्रेस युतीवर देवेंद्र फडणवीसांचा नाराजीचा सूर; म्हणाले, "असे काही घडले असेल तर...

"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

'अपघात व्हायची वाट पाहताय का?' अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी; महिनाभराच्या WR ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, Video व्हायरल