मुंबई

मुंबईत ५० मजल्यांपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी फायर फायटिंग व्हेईकलचा वापर केला जाणार

गिरीश चित्रे

३० मजल्यांपर्यंत पोहोचतील, अशा शिड्या मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहेत. परंतु ३० मजल्यांच्यावरील मजल्यास आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता फायर फायटिंग व्हेईकल तैनात ठेवण्यात येणार आहेत. या फायर फायटिंग व्हेईकलमध्ये अतिउच्च दाबाचे पंप बसवण्यात आले असून ५० मजल्यापर्यंत लागलेल्या आगीवर उच्च दाबाने पाण्याचा मारा करता येईल, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी दिली. दरम्यान, वांद्रे येथील जिवेश इमारतीतील लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर फायटिंग व्हेईकल उपयुक्त ठरल्याचे ते म्हणाले.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून उत्तुंग टॉवर उभारण्याची जणू शर्यतच लागली आहे. गगनचुंबी इमारतीत घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र मुंबई अग्निशमन दलात ९० मीटर म्हणजेच ३० मजल्यापर्यंत शिड्या पोहोचतील, अशा गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे ३० मजल्यावर आग लागल्यास मुंबई अग्निशमन दलाकडे गाड्या उपलब्ध नसल्याने लवकरच फायर फायटिंग व्हेईकल अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत.

दरम्यान, आगीसारख्या दुर्घटनेत वाहतूक कोंडीमुळे बचावकार्य करणार्‍या वाहनांना दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी काही वेळा उशीर झाल्याने दुर्घटनेची तीव्रता वाढून जीवित-वित्तहानी वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन दलात अद्ययावत सुविधा आणल्या जात आहेत. मुंबईत तब्बल ४० लाखांवर मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या अग्निसुरक्षेसाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

या भागांत तैनात करणार व्हेईकल

मुंबईत ए विभाग फोर्ट, जी/दक्षिण वरळी परिसर, के अंधेरी पूर्व-पश्चिम, पी/दक्षिण मालाड, आर/मध्य बोरिवली आदी भागांत उत्तुंग इमारतींचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा भागांचा अभ्यास करून हायराइज फायर फायटिंग व्हेइकलसाठी जागा निश्चित करण्यात येईल.

पहिल्याच परीक्षेत १०० टक्के उत्तीर्ण

अग्निशमन दलात सध्या एक प्रायोगिक तत्त्वावर हायराइज फायर सिस्टीम व्हेइकल आणले गेले आहे. याचा उपयोग सोमवारी वांद्रे बँडस्टँड येथे लागलेल्या आगीत या वाहनाचा उपयोग करण्यात आला. यामध्ये हे वाहन सक्षम असल्याचे सिद्ध झाल्याचे चौधरी यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक