मुंबई

‘फ्लोटिंग’ व्याजदर ‘फिक्स’

करण्याचा पर्याय द्या -रिझर्व्ह बँक

नवशक्ती Web Desk

मुंबई : गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. गृहकर्ज घेताना ग्राहकांसमोर व्याजदराचे ‘फिक्स’ व ‘फ्लोटिंग’ असे दोन पर्याय ठेवले जातात. एकदा व्याजदराचा एक पर्याय स्वीकारल्यानंतर ग्राहकांना दुसरा पर्याय निवडता येत नाही, मात्र ग्राहकांना हा पर्याय द्यावा, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना एका अधिसूचनेद्वारे दिले आहेत.

सध्या महागाई वाढल्याने व्याजदर वाढले आहेत. फ्लोटिंग व्याजदर घेणाऱ्या ग्राहकांना वाढीव ईएमआय भरावा लागतो. तो अव्वाच्या सव्वा होत असल्याने ग्राहकांची ईएमआय भरताना त्रेधा उडते. त्यामुळे आता आरबीआयने याबाबत पावले उचलली आहेत.

आरबीआयने आपल्या अधिसूचनेत सांगितले की, व्याजदर वाढवल्यावर कर्जाचा अवधी किंवा ईएमआय वाढवला जातो. हे करताना ग्राहकांना योग्य रीतीने ते सांगितले जात नाही. तसेच त्यांची मान्यताही घेतली जात नाही. आता कर्जदारांना योग्य प्रकारे सूचना देणे गरजेचे आहे. या वित्तीय कंपन्यांनी योग्य आराखडा बनवण्याचे आदेश दिले आहेत. कर्ज मंजूर करतानाच बँकांनी आपल्या ग्राहकांना व्याजदरात बदल झाल्यास ईएमआयवर किती परिणाम होऊ शकतो, हे स्पष्टपणे सांगावे. तसेच नवीन व्याजदर आकारताना ग्राहकांना ‘फिक्स’ व्याजदराचा पर्यायही दिला पाहिजे, असे मध्यवर्ती बँकेने सांगितले.

कर्जाच्या कालावधीत ‘फिक्स’चा पर्याय किती दिवस वापरायला मिळेल, हे ग्राहकांना कळवावे. ग्राहकांना ईएमआय वाढ किंवा मुदतवाढ असे दोन्ही पर्याय द्यावेत. त्याचबरोबरच ग्राहकांना कर्ज फेडताना अंशत: किंवा पूर्ण कर्ज फेडण्याची परवानगी कर्जाच्या कालावधीत कधीही दिली जावी.

महागाई वाढल्यानंतर मे २०२२ पासून आरबीआयने सतत व्याजदर वाढवत नेले. आतापर्यंत २५० बेसिस पॉइंटने व्याजदर वाढले आहेत. त्यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गृह, वाहन व अन्य वैयक्तिक कर्जाचे दर हे रेपो दराशी संलग्न असतात.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश