PM
मुंबई

चुन्नाभट्टी गोळीबाारप्रकरणी दोन शूटरसह चौघांना अटक ;आठ तासांत गुन्ह्यांचा पर्दाफाश

या गोळीबाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मारेकऱ्यांच्या अटकेसाठी नऊ पथके स्थापन केली होती

Swapnil S

मुंबई : चुन्नाभट्टी येथे रविवारी दुपारी झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश करण्यात चुन्नाभट्टी पोलिसांना यश आले आहे. गोळीबारानंतर पळून गेलेल्या दोन शूटरसह चौघांना अवघ्या आठ तासांत पोलिसांनी अटक केली. सागर संजय सावंत, सनील ऊर्फ सन्नी बाळाराम पाटील, नरेंद्र ऊर्फ नऱ्या गजानन पाटील आणि आशुतोष ऊर्फ बाबू देवीदास गावंड अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण चुन्नाभट्टीतील आहेत. पूर्ववैमस्नातून हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

या गुन्ह्यांत प्रभाकर पच्छिंद्रे याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर या चौघांनाही सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता चुन्नाभट्टी येथील व्ही. एन पुरव मार्गावरील आझाद गल्लीत बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता तर त्याचे तीन सहकारी रोशन निखील लोखंडे, आकाश खंडागळे, मदन पाटील आणि आठ वर्षांची मुलगी असे चार जण जखमी झाले होते. या जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या गोळीबाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मारेकऱ्यांच्या अटकेसाठी नऊ पथके स्थापन केली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या आठ तासांत पोलिसांनी विविध परिसरातून सागर सावंत, सनील पाटील, नरेंद्र पाटील आणि आशुतोष गावंड या चौघांना अटक केली. प्राथमिक तपासात सुमित आणि अटक आरोपींच्या दोन स्वतंत्र टोळ्या असून त्यांच्यात काही वर्षांपासून वाद आहे. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. या वादातूनच त्यांनी सुमितच्या हत्येची योजना बनविली होती. २ जानेवारीला सुमितचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्याला परिसरात त्याचे बॅनर लावायचे होते. त्यासाठी तो रविवारी आझाद गल्लीत आला होता. यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली होती.

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

इंजिनिअर ते करणी सेनेची महिला प्रमुख, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातची नवी मंत्री, अवघ्या तीन वर्षात मिळवलं यश

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन