मुंबई

घाटकोपर बेस्ट आगारातील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर ; पगारवाढीसह इतर सुविधा मिळत नसल्याने घेतला आक्रमक पवित्रा

नवशक्ती Web Desk

मुंबईच्या घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारला आहे. बेस्टच्या सुविधा, पगारवाढ मिळत नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. संप पुकारल्यानंतर या कर्मचाऱ्यांकडून मुंबईच्या आझाद मैदानावर आज (२ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता आंदोलन सुरु केलं आहे. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे नोकरदार वर्गाचे मात्र चांगलेच हाल होताना दिसत आहेत.

बेस्टच्या घाटकोपर डेपोतील कंत्राटी कर्मचारी आज सकाळपासून अचानक संपावर गेले आहेत. सोई सुविधा, ओव्हर टाईम, पगार वाढ अशा विविध मागण्या कंत्राटी कर्मचारी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा-खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला समर्थन दर्शवण्यासाठी तसंच त्यांच्या आदोलनात सहभागी होण्यासाठी बेस्टच्या कंत्राटी कामगारांकडून हा संप केला जातोय. याचा फटका मात्र नोकरदार वर्गाला बसणार आहेत.

मुंबई लोकलनंतर बेस्ट ही मुंबईची दुसरी जीवितवाहिनी मानली जाते. दररोज लाखोच्या संख्येने मुंबईकर या बेस्टने प्रवास करतात. यामुळे अचानक संप पुकारल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या कंत्राटी कामगारांची पगार वाढीची मागणी प्रलंबित आहे. सद्या या कर्मचाऱ्यांना १६ हजार रुपये वेतन मिळत असून हे वेदत २५ हजार करण्यात यावं अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, ही मागणी अद्याप पुर्ण झालेली नाही. तसंच इतर सोई सुविधा देखील मिळाव्या अशी देखील या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे.

घाटकोपर बेस्ट आगारातील संपावर गेलेल्या कंत्राटी चालकांची संख्या ही २८० एवढी आहे. संप पुकारलेले सर्व कर्मचारी हे डागा गृपचे असल्याची माहिती समोर आली आहे. हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून जोवर आपली मागण्या पुर्ण होत नाही, तोवर संप सुरुच राहील, असा पवित्रा कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. यामुळे घाटकोपरसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जनतेला मोठा त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र

'इराणसोबत व्यापारी करार केल्यास...', चाबहार बंदर करारानंतर अमेरिकेचा भारताला इशारा

PM Modi: उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी का गेले कालभैरव मंदिरात?

भीमा-कोरेगाव प्रकरण: गौतम नवलखा यांना मोठा दिलासा; SC ने दिला जामीन; उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती वाढवण्यास नकार