मुंबई

गणेशोत्सव काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त; पोलिसांच्या मदतीला एक लाख गणेशसेवक

प्रतिनिधी

गणेशोत्सव काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. यंदा पोलिसांच्या मदतीला गणेशसेवक कार्यरत असणार आहेत. गणेश मंडळाच्या सुरक्षेसह भक्तांची सुरक्षा याची जबाबदारी गणेशसेवकांवर सोपवण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळातील १० ते १२ स्वंयसेवक मंडळांना मुंबई पोलीस सुरक्षेचे धडे देणार असल्याने गणेशोत्सवात गणेशसेवकांवर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सुरक्षा ‘टाईट’ असणार आहे.

३१ ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून, गणेशभक्तांमध्ये लगबग सुरू झाली आहे; मात्र मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. त्यात मुंबईत २६/११ सारखा हल्ला करणार असा इशारा दहशतवादी संघटनांनी दिला आहे. मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून मुंबईची सुरक्षा करतात; मात्र यंदा पोलिसांच्या मदतीला गणेशसेवक कार्यरत असणार आहेत. मुंबई पोलीस सर्व प्रकारच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. तर मंडळांच्या मंपडपाच्या ठिकाणी दर्शनासाठी होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशोत्सव समिती पदाधिकार्‍यांची बैठक झाल्याचे गणेशोत्सव समितीचे नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

असे देणार सुरक्षेचे धडे

मंडपांच्या ठिकाणी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी गर्दीचे नियोजन

सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

मंडळांच्या गाड्यांवर ओळखीसाठी मंडळाच्या नावाचे स्टीकर

अनोळखी संशयितांच्या हालचाली ओळखणे

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था, वेगळ्या रांगा

संशयित वस्तू ओळखणे, आढळल्यानंतरची कार्यवाही

स्वयंसेवकांना विशेष ड्रेस कोड किंवा ओळखपत्र

प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, प्रसाद-हार, पिशव्यांची तपासणी

ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

ठाण्यात महायुतीच्या रॅलीत राडा; दोन टोळ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही काळ तणाव

"...मी कोणाच्या बापाचेही ऐकत नाही", अजित पवार यांचा विरोधकांना इशारा

कल्याणमध्ये ठाकरेंची नवी खेळी; माजी महापौर रमेश जाधवही मैदानात, दरेकर की जाधव, लढणार कोण?

प्रादेशिक असमतोलाचे भान राखणे गरजेचे!