मुंबई

नातवाचा सावत्र आजी- आजोबांवर हल्ला

याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपी नातू सर्फराज दिलबर बोरकर याला अटक केली आहे

प्रतिनिधी

मुंबई : सावत्र आजीवर चाकूने, तर वयोवृद्ध आजोबावर नातवाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रशीदा युसूफ भाटकर (५४) आणि तिचे पती युसुफ अब्दुल्ला भाटकर (८४) हे दोघेही जखमी झाले असून, दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपी नातू सर्फराज दिलबर बोरकर याला अटक केली असून, त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. युसूफ भाटकर हे कांदिवली परिसरात त्यांची दुसरी पत्नी रशीदासोबत राहतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून, तिच्यापासून त्यांना तीन मुले आहे. त्यापैकी त्यांची मोठी मुलगी मोमीना हिचा सर्फराज हा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यासोबत त्यांचे घराच्या मालकी हक्कावरुन वाद सुरू होता. त्यांच्या राहत्या घराचे वीज मीटर बिल तिने त्यांच्या परवानगीशिवाय तिच्या नावावर करून घेतला होता. त्यावरुन त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. बुधवारी ६ डिसेंबरला ते त्यांची पत्नी रशिदासोबत घरी आले होते. यावेळी त्यांच्या मागून सर्फराज आला आणि त्याने या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी देत पुन्हा शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्याने लाकडी दांड्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. काही वेळानंतर त्याने चाकूने रशीदाच्या गळ्यावर, डोक्यावर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य