प्रातिनिधिक छायाचित्र  Photo : Pinterest
मुंबई

वारंवार एकत्र राहण्याला 'विवाह' म्हटले जाऊ शकते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

वारंवार एकत्र राहणे तसेच मुलाचा जन्म होणे या गोष्टींमुळे निर्माण झालेले दीर्घकालीन घनिष्ठ नाते याला 'विवाह' म्हटले जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : वारंवार एकत्र राहणे तसेच मुलाचा जन्म होणे या गोष्टींमुळे निर्माण झालेले दीर्घकालीन घनिष्ठ नाते याला 'विवाह' म्हटले जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत खटला रद्द करण्याची विनंती करीत पुरुषाने न्यायालयाचे दार ठोठावले होते. तथापि, विवाहाचे नाते नाकारण्याचा याचिकाकर्त्याचा दावा न्यायालयाने फेटाळला कौटुंबिक हिंसाचाराचा खटला रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला. आणि महिलेवर कौटुंबिक हिंसाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी व त्याच्या कुटुंबीयांनी प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे वर्ग प्रलंबित असलेली कार्यवाही रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. तसेच २०२२ आणि २०२३ मध्ये पत्नीला आणि अल्पवयीन मुलीला पोटगी देण्याचे आदेश रद्द करण्यासाठी आरोपीने न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर न्या. एम. एम. नेरळीकर यांनी सुनावणी घेतली. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून याचिकाकर्ता व त्याच्या कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. न्या. नेरळीकर यांनी याचिकाकर्त्याला दिलासा नाकारला.

मात्र आरोपीचे पालक व त्याच्या पत्नीला दिलासा दिला. महिलेने आरोपीसोबतच्या दीर्घकालीन घनिष्ठ नात्याच्या आधारे कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता आणि पोटगीसाठी दंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, ती व आरोपीमध्ये शारीरिक संबंध झाले होते. त्यातून ती गर्भवती राहिली होती. असे असूनही आरोपीने नंतर लग्नाला नकार दिला आणि दुसऱ्या महिलेशी लग्न केले होते. त्यानंतर महिलेने आरोपीविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आणि बलात्काराचा आरोप करीत एफआयआर दाखल केली होती.

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर; बंगालमध्ये २३, २९ एप्रिल; तमिळनाडूत २३ एप्रिल, आसाम-केरळ-पुद्दुचेरीत ९ एप्रिलला मतदान; निकाल ४ मे रोजी

सिलिंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका; जळगावात दागिने तयार करण्याचे काम ठप्प

मुंबईकरांवर पाणीसंकट? पाण्याचे होत आहे वेगाने बाष्पीभवन; धरणांतील पाणीसाठ्यात निम्म्याहून अधिक घट

मुंबईतील बिहार भवनासाठी निविदा जारी; २४० कोटी रुपये अंदाजित खर्च

Mumbai : कफ परेडमध्ये समुद्रात भिंत घालण्यावरून वाद; रहिवासी, मच्छिमारांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव