मुंबई

अदानींना सर्वोच्च दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास सेबीकडेच, न्यायालयाने एसआयटी तपास नाकारला

सेबीच्या तपासात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही- न्यायमूर्ती मनोज मिश्रा

Swapnil S

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांना हिंडेनबर्ग प्रकरणात ‘सर्वोच्च’ दिलासा मिळाला आहे. हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला असून, अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय बुधवारी सुनावला. संबंधित प्रकरणात बाजार नियंत्रक ‘सेबी’ ही एक सक्षम यंत्रणा असून सेबीच्या तपासात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पर्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय सेबीच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही, असा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी तपास नाकारला असून, सेबीला चौकशी करण्यास सांगितले आहे. बाजार नियामक ‘सेबी’च्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार आहेत, जे अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी करत आहेत. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने २०२१ मध्ये होरायझन वर्ल्ड्स नावाची व्हर्च्युअल रिॲलिटी स्पेस तयार केली. यावर वापरकर्त्यांचा अवतार तयार केला जातो. गेम खेळण्यासोबतच लोक इतरांच्या अवतारांनाही भेटू शकतात. होरायझन वर्ल्ड्समध्ये व्हर्च्युअल स्तरावर लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. याप्रकरणी मेटा कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर अशा गुन्ह्यांना जागा नाही. हे टाळण्यासाठी आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी काही सीमा आखल्या आहेत. त्यामुळे अज्ञात लोकांना वापरकर्त्याच्या अवतारापासून दूर ठेवता येऊ शकते.

मेटाव्हर्स हे एक आभासी जग आहे, जिथे कोणीही आभासी (व्हर्च्युअली) पद्धतीने प्रवेश करू शकतो. परंतु, त्या ठिकाणी शारीरिकरीत्या उपस्थित असल्याची भावना असेल. म्हणजे एक आभासी जग आहे जिथे तुमची वेगळी ओळख आहे. येथे तुम्ही स्नॅप चॅट आणि बिटमोजीप्रमाणेच तुमचा डिजिटल अवतार तयार करू शकता. हा डिजिटल अवतार तयार करून, तुम्ही त्याच अवतारात फिरू शकता, खरेदी करू शकता, इतर लोकांना भेटू शकता, मालमत्ता खरेदी करू शकता आणि वास्तव जगात जे काही पाहता, ते करू शकता. येथे चलन म्हणून क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.

सत्यमेव जयते

सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर गौतम अदानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, “सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते. जे आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा मी आभारी आहे. भारताच्या विकासाच्या मार्गात आमचे विनम्र योगदान कायम राहील. जय हिंद

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video

Mumbai : खड्ड्यांची तक्रार आता एका क्लिकवर; नागरिकांसाठी BMC ची नवी सुविधा

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण