मुंबई

ED अधिकारी असल्याची बतावणी करून १० कोटी उकळले, 'रोमो भगत'ला अटक

या प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली होती.

Swapnil S

मुंबई : दहा कोटींच्या खंडणीप्रकरणी हिरेन रमेश भगत ऊर्फ रोमो या मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली. अटकेनंतर हिरेनला किल्ला कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्रीय तपास यंत्रण आणि राज्य पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत मदतीचे आश्‍वासन देऊन त्याने ताज हॉटेलच्या एका माजी महाव्यवस्थापकीय संचालकाकडून दहा कोटींची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

९२ वर्षांचे वृद्ध तक्रारदार वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, त्यांच्या मुलाच्या कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यस्तरीय तपास यंत्रणांनी कारवाई केली होती. त्यात त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी एका मित्राकडे विचारणा केली होती. यावेळी या मित्राने त्यांची ओळख हिरेन भगतशी करून दिली होती. हिरेनने तो ईडी अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांना मदतीचे तसेच त्यांच्या मुलाला या संपूर्ण प्रकरणात बाहेर काढण्याचे आश्‍वासन दिले होते. याच प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली होती.

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा