मुंबई

मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’; ऑडी कारची दोन रिक्षांना धडक, एकाची प्रकृती गंभीर

वरळीनंतर मुलुंड मध्ये ‘हिट अँड रन’ची घटना घडली असून भरधाव ऑडी कारचालकाने समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली.

Swapnil S

मुंबई : वरळीनंतर मुलुंड मध्ये ‘हिट अँड रन’ची घटना घडली असून भरधाव ऑडी कारचालकाने समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकासह ४ जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या ऑडीचालकाला कांजूरमार्ग येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड पश्चिम येथील डम्पिंग रोड या ठिकाणी सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विजय दत्तात्रय गोरे (४३) असे अपघाता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑडी चालकाचे नाव आहे. ऑडीचालकाने मद्यपान केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विजय हा एका आयटी कंपनीत नोकरीला असून रविवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी मद्यपान केले. कर्जतमध्येही मजामस्ती केल्यानंतर ठाण्यात मित्रांना सोडून मुंबईच्या दिशेने जात असताना, मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड येथे भरधाव वेगात असलेल्या ऑडीने प्रवाशी घेऊन मुलुंड स्थानकाकडे निघालेल्या दोन रिक्षांना समोरून धडक दिली. या धडकेत दोन्ही रिक्षांचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या विजय मोटार तेथेच सोडून पळून गेला. पोलिसांना कारमध्ये आढळलेल्या मोबाईल फोनद्वारे पोलिसांनी विजय गोरेला कांजूरमार्ग येथून अटक केली.

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार