मुंबई

दुकानांना मराठी पाट्या नसल्यास कारवाई होणार

प्रतिनिधी

दुकानांच्या दर्शनीभागी मराठी फलक ठळकपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. ३० जूनपर्यंत पालिकेच्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दिली. दरम्यान, मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आणखी सहा महिने मुदतवाढ व्यापारी संघटनांनी मागितली असून ते शक्य नसल्याचे व्यापारी संघटनांना सांगितल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दुकानांच्या दर्शनीभागी मराठी फलक ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने लावणे बंधनकारक केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर दुकानांवर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा लावणे यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने ३१ मेपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र दुकानदारांनी मुदतवाढीची मागणी केल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने आणखी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती. मात्र ३० जूननंतर मराठी पाट्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील, अशा लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, मद्यविक्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

संघटनांचा अडचणींचा पाढा

मराठी पाट्या दिसतील अशा अक्षरात लिहिण्यासाठी कारागीर उपलब्ध होत नाहीत. तसेच काही कारागीर पैसे जादा आकारत आहेत. तर पैसे देऊन कारागीर मिळत नसल्याची खंत व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?