संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai Rains Updates: आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा; मुंबईला उद्या सकाळी ८.३० पर्यंत रेड अलर्ट!

Mumbai Rain Update, Red Alert : राज्यात अनेक अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या, २६ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Tejashree Gaikwad

IMD Alert: गुरुवारी (२५ जुलै) मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहरात अनेक भागात पाणी साचले आहे. भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या (२६ जुलै) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाकडून विनंती करण्यात आली आहे की, कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असलेल्या भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईला मंगळवारी सकाळी मुंबईला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.

बीएमसीने पाणी कपात घेतली मागे

बीएमसी २९ जुलैपासून १० टक्के पाणीकपात मागे घेणार आहे. ही कपात ५ जून रोजी लागू करण्यात आली होती. परंतु सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणीसाठा गुरुवारी त्यांच्या एकूण क्षमतेच्या ६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

प्रशासनाने दिला पावसाचा इशारा

मंत्रालयातून नागरिकांना फोन मेसेजद्वारे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ' भारतीय हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर, पुणे , ठाणे , रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.'

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

> सद्यस्थितीत विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ६६.७७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

> या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.

> तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक