मुंबई

पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात केली सुधारणा; महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत.

प्रतिनिधी

कमी दाबाने पाणीपुरवठा, गढूळ पाणीपुरवठा या तक्रारी आता दूर होणार आहेत. पश्चिम उपनगरातील रहिवाशांना आता स्वच्छ व भरपूर पाणी मिळणार आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून ४५० ते ९०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार आहे. त्यामुळे कांदिवली, बोरिवली व दहिसर येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणी अशा तक्रारी येत असतात. मुंबईकरांना समान पाणीवाटपाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी, यासाठी जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. पश्चिम उपनगरातील कांदिवली, बोरिवली व दहिसर भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ८० ते ३०० मि.मी. व्यासाच्या व काही भागात ४५० व ९०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने निविदा मागवल्या असून २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्याने दिली.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी