मुंबई

टास्कच्या नावाने तरुणीसह दोघांची फसवणूक

पार्टटाईम नोकरीची बतावणी करून त्यांना जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले

नवशक्ती Web Desk

मुंबई : टास्कच्या नावाने एका नामांकित बँकेच्या कर्मचारी तरुणीसह दोघांची अज्ञात सायबर ठगानी ९ लाख ४१ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना साकिनाका परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरू केला आहे. बँकेतील कर्मचारीच थोड्या कमिशनच्या मोहापायी सायबर ठगाच्या जाळ्यात फसत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. २४ वर्षांची ही तरुणी तिच्या एका मैत्रिणीसोबत राहत असून, ती एका नामांकित बँकेत कामाला आहे.

१९ सप्टेंबरला तिला एका अज्ञात मोबाईलवर एक मॅसेज प्राप्त झाला होता. यूट्यूबच्या व्हिडीओ व लिंकला लाईक तसेच सबस्क्राईब केले, तर तिला तीन लाईकनंतर काही रक्कम कमिशन म्हणून मिळेल, असे नमूद केले होते. दुसऱ्या घटनेत एका ३२ वर्षांच्या व्यक्तीची अशाच प्रकारे सायबर ठगाने ३ लाख ५३ हजाराची फसवणूक केली. पार्टटाईम नोकरीची बतावणी करून त्यांना जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी